प्रेमावर चारोळ्या संग्रह मराठी / Premavar charolya sangrah marathi.
|
Premavar charolya image |
तुझे नाव घ्यायला आता मला
माझ्या ह्रदयाला विचारवं लागतय
बघितलस माझं हृदय ही आता
अगदी तुझ्या सारखचं वागतय..
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ.
तुझे हसने
सर्वापेक्षा ही गोड आहे
तुझ्या त्या हास्या कडेच तर
माझ्या प्रेमाची ओढ आहे.
हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे.
तुझ्या प्रेमाची चाहूल लागताच
झाडे वेलीं हलू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात.
काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही..
प्रेम असचं असतं,
हे शब्दात सांगता येत नाही.
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
हे तुला कळेल का..
माझी जीवन साथी म्हणून,
तू माझ्याशी लग्न करशील का ?
तुझ्यासाठी जन्म घेतला,
तुझ्यासाठीच मरणार आहे...
तुझ्यावाचून माझ्या जीवनाला
अर्थ तरी काय उरणार आहे.
रोमँटिक चारोळ्या मराठी / Romantic charolya marathi.
|
Romantic prem charolya |
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतीस.
हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले....
बोटांना माझ्या आता
वेगळं राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ....
मऊपण काय असत
हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं
त्या एका स्पर्शातच मी
तीच प्रेम मागितलं.
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य.
चांद भरली रात आहे,
प्रियकराची साथ आहे..
मोगऱ्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसत आहे.
तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो.
तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला..
तू अशी लाजलिस की
मलाही काही सूचत नाही
तुझे मुरकने पहिल्याशिवाय
मला चैन पडत नाही.
डोळ्यांच काय
ते नेहमी पाणावतात
माझं तुझ्यावरचं प्रेम
अप्रत्यक्षपणे खुणावतात.
प्रेम चारोळी स्टेटस मराठी / Premavar charoli status marathi.
अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.
असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार.
अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..
माझ्यासाठी प्रेम म्हणजे
मोठ कुतूहल आहे
पडले नाही तरी लागते
अशी एक चाहूल आहे.
आपली पहिली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेवून गेली.
तुझ्या नाजुक पणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं...
जीवनाचा धागा धरता धरता
मिळाला प्रेमाचा दोरखंड
कदाचित म्हणूनच आपलं प्रेम
राहिल अजरामर अखंड.
वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.
चालताना हळूच दचकून
माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित
मला तुझी साथ हवी...
कधी तू कधी मी
एकमेकांशी भांडू ....
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू....
प्रेम चारोळी sms मराठी / love charoli sms marathi.
गुलाबासारखे
रूप तुझे देखणे
ओठातल्या शब्दांनी
धुंद मला करणे..
गालावरची खळी पड़ते
डोळ्यात तुझे स्वप्न रंगवतो
का बरं असा मी
स्वताला तुझ्यात गुंतवतो.
माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का?
तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येतामध्ये
डोळे माझे आपोआप झुकले ..
प्रेम जेव्हा उमलत होतं
तेव्हाच सारं बरसत होतं
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा फसवत होतं.
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण.
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा
हे आपलं अबोल प्रेम
असचं सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही.
तुझ्याच त्या स्मित हास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते..
तू भेटलीस त्या वाटेवर
सगळीकडे प्रेमच होतं
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर
कुठल्या जन्माचं ऋण होतं.
सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस..
तुझ्या डोळ्यात मला
माझी प्रीत दिसते
तुझ्या ओठांवर मला
माझे गीत दिसते..
तो चंद्र नभीचा भुलवतो बघ
मज शीतल प्रेम लहरींनी
आंस परी जळण्याची मजला
मी तुझीच रे दिवाणी.
प्रेमाला नात्यात बसवणं
खुपदा प्रेमाला घातक ठरतं
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं.
तुझ्या केसातील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुझ्यापेक्षा सुंदर दिसत नव्हते.
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठ्या तू
तो चंद्र ढगात लपता........
मला वेड लागलयं
हा दावाच तकलादू आहे
मी वेड्यासारखा वागतोय
ही तर प्रेमाची जादू आहे !!
प्रेम करायचं म्हटलं तर
कुणाशीही जमत नाही
मनासारख्या जोड़ीदाराशिवाय
संसारात मन रमत नाही.,
तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर
लाजाळूचं झाडही पान पसरतं
तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन
पान मिटायलाही ते विसरतं..
गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,
कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवन गाणे तू,
सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवी किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू..
हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..
प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं.
मिलनाच्या रातीला..
सहवास तुझा साथीला..
मग काय हवय अजून,
या मधुचंद्राच्या रातीला..
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत...
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत...
उभा मी शांत आज ,
तूझ्याकडे पाहतं...
समोर माझ्या एक फुल ,
नुकतच होतं फुलतं...
मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा..
ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का...
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?
प्रेमाच्या या दिवशी ,
प्रेम किती ते दाखवायचे...
काय गरज आपल्याला ,
आपण रोजच तेवढे करायचे.
तुझ्यावर काही लिहताना ,
ह्रदयाला नेहमीच सोबत घेतो...
तुझ्यासाठीची प्रत्येक ओळ
मग ह्रदयातून लिहत राहतो.
आज मला एक चांदणी ,
तुझ्यासारखीच भासली...
मला पाहून हळूच ,
गालातल्या गालात हसली.
माझ्यातला मी नेहमीच
कोणात तरी हरवलेला...
तुला तो दरवेळी
तुझ्यातच सापडलेला.
मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यात बसवू पाहतो...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
मला तुझ्यासमोर कमीच वाटतो.
नेहमीच ठरवायचो तू उशीरा आल्यावर
आता तूझ्यावर रागवायचं...
पण तू दिसल्यावर माझंच मन
माझ्याविरुद्ध वागायचं.
तुझ्या प्रेमासाठीच जगायचे होते,
मला या जगाला विसरुन...
या जगाला दाखवायचे होते,
तुझ्यासाठी किती प्रेम ठेवलंय साठवून.
तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
कडू चहात गोडवा येतो...
साखर घातलेला चहाही मग तुझ्या
ओठांशिवाय कडवा होतो.
मिठीत जेव्हा तुला
हळूच माझ्या घेतले...
खरं सांग तू तेव्हा
कितीसे तुझ्यात उरले...
तुला पाहण्याचा अवकाश ,
आणि कविता जूळून येते ...
लिहिले मी जरी, खरी कविता
तुझ्यामुळेच तर सुचते..
पाहून तुला तो ,
चंद्रही फसेल...
चांदणी समजून,
पाहत तुलाच बसेल..
तिच्या बाबतीत मी ,
थोडा शहानपणाने वागतो...
ती दिसली रागवलेली ,
मीच माफी मागून घेतो.
डोळे तुझे कातील ,
ह्रदयावर वार करतात....
ह्रदयातील प्रेमाची अलगद ,
तार छेडतात.
ह्रदय ही हल्ल माझं
तुझ्याशिवाय काहीच मागत नाही...
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही.
तू मला हवी आहेस,
तू जशी आहेस तशीच...
जपेन तुला आयुष्यभर
राणी फक्त माझ्यासाठीच.
हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय....
स्वतःच ह्रदय मात्र
माझ्याकडे ठेवून गेलंय.
तुझ्यात काही खास आहे
म्हणूनच तुझ्यावर मरतोय...
माझ्या कवितेची प्रत्येक
ओळ तुझ्याचसाठी लिहतोय.
जगतोय तुझ्या प्रेमासाठी,
हजारो संकटे झेलतोय तरी...
आहेस तू सोबत म्हणून लढतोय
सोबत दुसरे कोणी नसली जरी.
गोड तुझ्या हास्याने
प्रेमात पाडले मला...
मजबूर केले त्यांनी
तुझ्या प्रेमात पडायला.
हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले....
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले.
कोण म्हणते तुझ्या कुरूप चेहऱ्यामुळे
कोणीही प्रेम करत नाही तुझ्यावर,
अगं वेडे माझे प्रेम आहे ना
तुझ्या सुंदर अशा मनावर.
प्रेमाला तुझ्या मी...
हातावरी फोडा प्रमाणे जपतोय.
तुला त्रास होऊन नये म्हणून.
तुला पाहताना चोरा प्रमाणे वागतोय.
मी समोर येताच
तू हळूच लाजतेस,
स्पर्श माझा होताच मग
फुला सारखी फुलून जातेस.
वेड लावते मला
हसून लाजणे तुझे
गालावरच्या खळीतले
ते गोड हसणे तुझे.
थेंबोथेंबी मग दिसतो
मज हसणारा तो चेहरा
थोडासा सावळ, निळसर
अन् थोडा रंगबिलोरा.
कसं फुललं ना ?
तुझं अन् माझं नातं
एक चिंब दवबिंदु
अन् एक आळवाच पातं.
बहार यावी शब्दांत जेव्हा
मनात माझ्या तुला बघावे
तुझ्या गुलाबी खळी मधूनी
मि प्रीत थेंबा टिपून घ्यावे.
तु लाजताना मनात काही
मी चांदण्यांला कवेत घ्यावे
हसू खुलेल्या तुझ्या अधीरी
अधीर माझे मी टेकवावे.
Comments
Post a Comment
धन्यवाद